मराठी मैत्री कविता
Marathi Friendship Kavita
" मैत्री "अशी असावी,
भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी,
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,
दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी,
एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी,
शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,
न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी...
भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी,
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,
दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी,
एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी,
शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,
न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी...
Marathi kavita on friendship:
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघार घेऊ नकोस...!
Friendship Marathi kavita images:
मैत्री म्हणजे तू
तू म्हणजे माझा श्र्वास
मैत्री म्हणजे मी
मी म्हणजे तुझा भास ....
मैत्री म्हणजे गाणं
मैत्री म्हणजे भान
मैत्री म्हणजे जीवन
मैत्री म्हणजे पिंपळ्पान....