Showing posts with label Marathi kavita on rain. Show all posts
Showing posts with label Marathi kavita on rain. Show all posts

Marathi kavita on rain पाऊस

 मराठी-कविता-पाउस-rain

रिपरिप येतो मनि   तरंगतो   आनंदाचे   गाणे
रंग   येऊन  पानोपानि स्मरवितो तराणे
पाऊस आला , पाऊस आला , पाऊस आला .
बालपणाच्या आठवणी   घेऊन तो येतो
पाण्यातल्या   होड्या नि गाणि तो गातो
वारा पण   अलगद डोलु  लागतो
हिरवा  निसर्ग  सारा  ओलागार होतो
पाऊस आला , पाऊस आला , पाऊस आला .
मित्र  तो , सखा तो , हळवार येतो
मन प्रसन्न करुन तो आनंद देतो
गरम चहाचा  स्वाद तो वेगळाच देतो
खिडकित  बघताना तो डाळे टिपुन घेतो
हाताच्या बोटावर तो  आपला नाच करतो
पाऊस आला , पाऊस आला , पाऊस  आला .
राहुल  पाठक

 

marathi kavita rain

 Marathi kavita rain

marathi kavita rain1


marathi kavita rain3




प्रेमाचा पाऊस  

 ती चिंब  तो चिंब ...

   दोघांच्या नजरेत , प्रेम प्रतिबिंब ..
ओला थेंब ,ओली सर ...
प्रीतिची रात्र ,मिठीतला बहर ....
ढगांचे बाण ,विजेचे तीर ...
ओठांवर ओठ आणी श्र्वासही आधीर ..
मनाचा सांगावा ,शब्दात  बांधावा ...
प्रेमाचा पाउस कधी न कधी थांबावा ...


marathi kavita rain7

Read more...
Powered by Blogger.

  © Blogger template The Beach by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP