Showing posts with label Marathi maitri kavita. Show all posts
Showing posts with label Marathi maitri kavita. Show all posts

मैत्री Marathi Maitri Kavita

मैत्री मराठी कविता 

कधी कळतील तिला माझ्या मनातल्या भावना.
कधी कळतील चंद्राला या तारयांची  साधना.

माझ्या हृदयातील चुलबुल तिला कशी समजली नाही.
या डोळ्यांचे इशारे तिला कसे गवसले नाही.

तिला पाहताच मी झालो होतो तिचा.
तेव्हा पासून चढली  मला एक वेगळीच नशा.

तिचे बोलणे तिचे हसणे काय  सांगू .
मनातच म्हटले  मी तिच्या शिवाय  कसा राहू.

बघता बघता मी तिच्या प्रेमात दुब्लो.
मित्रांमध्ये असतानापण तिच्या आठवणीत  बुडलो. 

तरीही तिला माझ्या मनाची धडपड समजली नाही. 
या कोवळ्या जीवाची आस कळली नाही.

मैत्री कविता वॉलपेपर  

maitri kavita

मैत्री कविता    

काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....

मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत

अंतर वाढल
म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत

गाठी
नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत
परके झाले तरी आपलेपण नाही सरत

नवीन
नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही
नाती नाही तुटत

एकहीमित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या
पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल


शरीरात रक्त
नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती
नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या
नात्यात
ओढ असते कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.
मैत्रीच्या
या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरेनात्याला नसले तरी
मैत्रिला एक रूप आहे


मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद
असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो!!!!

--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......

 

 

Read more...
Powered by Blogger.

  © Blogger template The Beach by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP