Marathi kavita aai : माया ममता भरुन जीव लावते आई, नाही जगात कोठे

मराठी कविता  आई 

माया ममता भरुन जीव लावते आई 
नाही जगात कोठे अशी दूसरी ममताई ..

मंदिराचा कलस दिसावा तशी आईची ख्याती 
अंगणातील तुलशी प्रमाने संभालते घराची नाती 
प्रेमस्वरूप तुझे वास्तले तुझी सुमूर्ति मनात ठाई  
घराघरात दारादारात  तुझे स्मरण होते आई ...
Aai


आई

आईला  कधीच मरण नसतं 
आई म्हणजे नदीवरचं  धरण  असतं 

आई म्हणजे खळ्खळनारा  ओढा  असतो 
आई म्हणजे चाँदन्यांचा सडा  असतो 

आई सशाचं काळीज ,स्निहाची छाती 
आई डोक्यावरच आभाळ ,पायाखालची माती 

आई हवेची झुळुक ,देवाघरातला दिवा 
आई कालाजातली बासरी ,ओठावरचा पावा 

आई म्हणजे भाकरी ,
अहोरात्र चाकरी 
आराम नाहीं ,विराम नाहीं 
कष्टाला  विराम नाही .
सारखं सारखं राबायचं 
रात्री निजल्यावर्ती पुन्हा 
माझं अंग दाबयचं .

एक दिवसी उठून रात्रीचे 
आईचे मी दाबले पाय 
आई म्हणाली ,"अग अगं 
असं करतेस काय ?"

मी म्हणाले ,"तुझे आई 
दाबनार कोण पाय ?
माझे पाय दाबतेस  तू 
माझ्यात का्य  आहे ?


Post a Comment

Powered by Blogger.

  © Blogger template The Beach by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP